शैक्षणिक

व्यंकटराव हायस्कूलचे शासकीय चित्रकला परीक्षेत यश

Venkatrao High Schools success in government painting exam


By nisha patil - 12/1/2026 1:05:08 PM
Share This News:



*आजरा(हसन तकीलदार )*:-येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता आठवी, नववी व दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणारी चित्रकला ग्रेड परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये उज्वल सुयश संपादन केले. 
एलिमेंटरी परीक्षेसाठी इयत्ता आठवी या वर्गातील  एकूण 68 विद्यार्थी प्रविष्ट झाले पैकी 67 उत्तीर्ण झाले त्यामधील "अ "श्रेणी प्राप्त विद्यार्थी 
1. अन्मया रणजीत देसाई 
2. कल्याणी सुभाष सुतार 
3. सोहम सचिन केरकर 
व ,"ब"श्रेणी प्राप्त विद्यार्थी 
1. अथर्व शांताराम नाईक 
2. बाणी विजय यादव 
3. ज्ञानेश्वरी संतोष देसाई 
4. राजवीर सुरज जाधव 
उर्वरित 60 विद्यार्थी "क" श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.

त्याचबरोबर "इंटरमिजिएट" परीक्षेमध्ये इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये 51 विद्यार्थी बसले पैकी 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील "अ" श्रेणी प्राप्त विद्यार्थी
1. आस्था सचिन गुरव 
2. अवधूत अमित सावंत 
3. चिराग सागर चौगुले 
4. निरंजन गणेश पाटील 
5. पौरस संदीप देवरकर
6. प्रेम रमेश येसणे 
7. साक्षी नरेंद्र कुंभार 
8. सिद्धार्थ बाळू सुतार 
9. वैभव विठ्ठल कांबळे 
व" ब "श्रेणी प्राप्त विद्यार्थी...
1. अंशुमन हिम्मत भोसले 
2. अर्चना सागर इलगे 
3. चैतन्य विशाल वडवळे 
4. धनश्री महेश देसाई 
5. ईशान सुरजीत मोटे
6. कार्तिक सुरेश हुबळे 
7. माधवी जीवन आजगेकर
8. रिया अरविंद देशमुख 
9. रुद्र अनिल भिसोरे
10. साहिल दीपक पाटील 
11. सानवी लक्ष्मण सोले 
12. श्रीतेज संदीप नरके 
13. स्वराली प्रशांत चौगुले. 
उर्वरित 28 विद्यार्थी "क "श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.

    इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बोर्डा मार्फत एकूण गुणांमध्ये वाढीव गुण मिळत असल्याने दिवसेंदिवस या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत.
    वरील सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष  जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य  एम.एम.नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले व एक आदर्श आणि कलेत निपुण असलेले कलाशिक्षक कृष्णा दावणे यांचे मार्गदर्शन लाभले.


व्यंकटराव हायस्कूलचे शासकीय चित्रकला परीक्षेत यश
Total Views: 23