बातम्या
व्यंकटराव प्रशालेत कै. अमृतराव (काका) देसाई यांना आदरांजली
By nisha patil - 8/28/2025 11:06:59 PM
Share This News:
व्यंकटराव प्रशालेत कै. अमृतराव (काका) देसाई यांना आदरांजली
आजरा(हसन तकीलदार) (प्रतिनिधी): व्यंकटराव शिक्षण संकुल, आजरा येथे संस्थेचे माजी अध्यक्ष आणि आजऱ्याच्या राजकीय, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी अमृतराव काकांचे कार्य स्मरण करत सांगितले की, आजऱ्याच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी राईस मिल, जनता बँक, तालुका संघ उभारले तसेच साखर कारखान्याचे स्वप्न पाहिले.
या प्रसंगी सचिव अभिषेक शिंपी, संचालक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी कै. अमृतराव (काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले तर आभार डी. आर. पाटील यांनी मानले.
व्यंकटराव प्रशालेत कै. अमृतराव (काका) देसाई यांना आदरांजली
|