खेळ

व्यंकटराव विद्यालयाच्या कबड्डीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Venkatrao Vidyalaya


By nisha patil - 9/16/2025 10:47:08 AM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार) : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कोल्हापूर आयोजित आणि पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण १७ संघांनी सहभाग नोंदवला.

त्यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा यांच्या मुला व मुलींच्या कबड्डी संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कबड्डी या खेळात व्यंकटराव विद्यालयाचा दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

या यशामागे आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, संचालक मंडळ, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, वर्गशिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडाशिक्षक एस. एम. पाटील, सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती आर. एन. पाटील, मस्कर सर, आर. पी. पाटील, श्रीमती एस. बी. कुपेकर, पोवार मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही व्यंकटराव विद्यालयाचे कबड्डीपटू चमक दाखवतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.


व्यंकटराव विद्यालयाच्या कबड्डीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Total Views: 45