बातम्या
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
By nisha patil - 8/19/2025 6:41:15 PM
Share This News:
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं सोमवारी ठाण्यात निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नाही.
अच्युत पोतदार यांचा अंत्यसंस्कार 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात करण्यात येणार आहे.
सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी इंडियन ऑइल कंपनीत काम केलं. त्यानंतर अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी 1980 च्या दशकात रुपेरी पडद्यावर पाऊल टाकलं. तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये सक्रिय राहून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली.
त्यांनी 125 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या. 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'भाई', 'दबंग 2' आणि 'व्हेंटिलेटर' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
विशेष म्हणजे, आमिर खानच्या '3 इडियट्स' मधील प्राध्यापकाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली सैन्यदल, इंडियन ऑइल आणि अभिनय – अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे अच्युत पोतदार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
|