बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 6/22/2026 11:29:06 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर दि.22 : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर मध्ये 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यम नियम आसन आहार प्रत्याहार प्राणायाम योग व समाधी या योगाच्या अष्टांग क्रिये द्वारा मानवी जीवन उन्नत व समृद्ध बनविता येते. मानसिक भावनिक आणि शारीरिक पातळीवरील संतुलन हे जीवन उर्जेस सकारात्मक दिशा व गतीने येथे असे मत डॉ. राजश्री पाटील आर्ट ऑफ लिविंगच्या तज्ञ मार्गदर्शक यांनी मत मांडले.
निरोगी वृद्धत्वासाठी योग या मथळ्याच्या आधारे भारतीय आयुर्विज्ञान व आयुष मंत्रालयाद्वारे निर्देशित केलेल्या संहितेच्या आधारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
अष्टांग योग आसनाद्वारे गतिशील जीवन शैलीला अधिक गुणवत्ता पूर्णपणे बनविता येते. योग आपल्या शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर संतुलित आणि निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करतो. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, तणाव कमी होतो, एकाग्रता आणि आंतरिक शांतता लाभते. योग आणि धारणा याद्वारे दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करून आपणास इच्छित असणारे ध्येय साध्य करता येते. असे मत अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले तर आभार डॉ. विकास जाधव यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कौस्तुभ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कर्नल मानस दीक्षित पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर, कर्नल विक्रम नलवडे सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पाडला.कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, डॉ.नम्रता नरेवाडीकर काळजीवाहू एन.सी.सी.अधिकारी, प्रा संदीप पाटील, एन.एस.एस.कार्यक्रमाधिकारी, श्री सचीन धनवडे प्रबंधक, एन एस एस , एनएसएस विभाग व जिमखाना विभाग यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ प्रविण बागडी, डॉ. राजश्री पाटील, प्रा वाघमारे , ग्रंथपाल डॉ निता पाटील, प्रा. संतोष कुंडले, प्रा हेमंत पाटील, प्रा.प्रशांत कांबळे प्रा साद मुजावर व कार्यालयीन कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
|