बातम्या
डिजिटल अरेस्टचा फटका बसला? बँकेलाच भरावा लागणार नुकसानभरपाईचा पैसा!
By nisha patil - 10/30/2026 5:06:11 PM
Share This News:
डिजिटल अरेस्टचा फटका बसला? बँकेलाच भरावा लागणार नुकसानभरपाईचा पैसा!
नवी दिल्ली : डिजिटल अरेस्टच्या वाढत्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. संशयास्पद व्यवहार वेळीच रोखण्यात बँका अपयशी ठरल्यास त्यांना पीडितांना नुकसानभरपाई द्यावी लागू शकते, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
बँकांनी असामान्य व्यवहारांची तातडीने पडताळणी करून गरज पडल्यास व्यवहार स्थगित करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरपर्यंत कडक नियमावली लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती अटर्नी जनरल यांनी दिली. त्यामुळे सायबर फसवणूक रोखण्यासाठी आता बँकांची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे
डिजिटल अरेस्टचा फटका बसला? बँकेलाच भरावा लागणार नुकसानभरपाईचा पैसा!
|