बातम्या

कोल्हापूर रस्त्यावर प्रशासनाच्या अनास्थेचा बळी; एसटी चिरडून कामगार महिलेला मृत्यू

Victim of administration


By nisha patil - 9/16/2025 3:57:37 PM
Share This News:



कोल्हापूर रस्त्यावर प्रशासनाच्या अनास्थेचा बळी; एसटी चिरडून कामगार महिलेला मृत्यू

सांगलीतील गंगाधर नगर परिसरातील शीतल प्रकाश आंब्रे (वय ४१) या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला दुर्दैवी अपघातात प्राण गमवावा लागला. कोल्हापूरहून परतताना आकाशवाणी केंद्राजवळ एसटीतून उतरलेल्या शीतल आंब्रे यांना त्याच बसने चिरडले. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, कोल्हापूर रस्त्यावरील रखडलेल्या कामांबाबत वारंवार निवेदने, आमदारांचे पत्रव्यवहार असूनही पालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. याआधीही या रस्त्यावर सात जणांचा बळी गेला असून लहानमोठे अपघात नित्याचे झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अनास्थेमुळेच शीतल आंब्रे यांचा बळी गेला असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केला आहे.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोल्हापूर रस्त्यावर प्रशासनाच्या अनास्थेचा बळी; एसटी चिरडून कामगार महिलेला मृत्यू
Total Views: 102