बातम्या

मराठा आरक्षण लढ्यातील यशानंतर कुरुंदवाड परिसरामध्ये विजयोत्सव .

Victory celebrations in Kurundwad


By nisha patil - 3/9/2025 5:31:06 PM
Share This News:



मराठा आरक्षण लढ्यातील यशानंतर कुरुंदवाड परिसरामध्ये विजयोत्सव .

 मुंबईमध्ये आरक्षण लढ्यासाठी आदरणीय मनोज दादा जांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं होतं काल मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि आरोग्य पाटलांनी उपोषण स्थगित केलं त्यामध्ये मराठा कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅजेट तात्काळ लागू सातारा पुणे औंध मुंबई याची साठी एक महिन्याचा अवधी अशा अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कुरुंदवाड परिसरातील सर्व समाज बांधवांनी गावातून मोटरसायकल रॅली काढून नगरपालिका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोंना दुग्धाभिषेक करण्यात आला .

तसेच  साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर महाराष्ट्रातील मराठ्यांची  खरी ताकद मुंबईमध्ये  दाखवली असेल तर ती  मराठा योद्धा आ.मनोजदादा जंरागे पाटलांनी. मराठा आरक्षण मागण्यांच्या बाबतीत सरकारने  दगा फटका केल्यास परत मनोज जरांगे पाटलांचे नेतृत्वाखाली  मुंबईवर धडक मारली जाईल असा इशारा देण्यात आला .
यावेळी सकल मराठा समाजासह सर्व धर्मीय समाजबांधव उपस्थित होते.


मराठा आरक्षण लढ्यातील यशानंतर कुरुंदवाड परिसरामध्ये विजयोत्सव .
Total Views: 50