राजकीय
प्रचार फेरीद्वारे विजयेंद्र माने यांचा प्रभाग ३ मधील माकडवाला वसाहतीत जनतेशी संवाद
By Administrator - 11/1/2026 12:04:44 PM
Share This News:
प्रभाग क्रमांक ३ मधील माकडवाला वसाहत परिसरात विजयेंद्र माने यांनी आज प्रचार फेरी काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. या प्रचार फेरीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.
नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत विजयेंद्र माने यांनी त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या सहकार्यानेच विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र माने म्हणाले, “जनतेचा विश्वास आमच्यासोबत आहे. शेवटी विजय आमचाच होणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रचार फेरीत स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रचार फेरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
प्रचार फेरीद्वारे विजयेंद्र माने यांचा प्रभाग ३ मधील माकडवाला वसाहतीत जनतेशी संवाद
|