बातम्या

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

Vijayendra mane


By nisha patil - 3/7/2026 4:00:08 PM
Share This News:



वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

विजयेंद्रसिंह माने यांच्या वाढदिवसानिमित्त हरित संकल्प; वृक्षारोपणातून सामाजिक बांधिलकी

वाढदिवसाचा अनोखा उपक्रम! वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक विजयेंद्रसिंह विश्वासराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

दि. ३ जुलै रोजी रुईकर कॉलनी ग्राउंड येथे रुईकर कॉलनी युवा मंच, सहयोग मित्रपरिवार, इनर व्हील क्लब आणि मॉर्निंग वॉकर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोकुळ दूध संघाच्या संचालिका मा. शोमिकाताई महाडिक तसेच शिवसेना जिल्हा समन्वयक मा. सत्यजित नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. "एक वृक्ष लावूया... हरित भविष्यासाठी संकल्प करूया" हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

नगरसेवक विजयेंद्रसिंह विश्वासराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाला नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.


वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश
Total Views: 20