विशेष बातम्या
श्री गुरुदेव पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी टाकळीवाडी चे सुपुत्र विजयकुमार गणपती खोत यांची बिनविरोध निवड
By nisha patil - 5/30/2025 3:32:24 PM
Share This News:
श्री गुरुदेव पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी टाकळीवाडी चे सुपुत्र विजयकुमार गणपती खोत यांची बिनविरोध निवड
टाकळीवाडी प्रतिनिधी टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील विजयकुमार गणपती खोत यांची गुरुदेव पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टाकळीवाडी गावामध्ये कौतुक होत आहे.
श्री गुरुदेव पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली या सहकारी पतसंस्थेच्या 2024-25 ते 2029-30 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची आणि पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोधपणे पार पडली.
सदर कालावधी करिता अध्यक्ष म्हणून श्री. गोविंद दत्तात्रय धुमाळ यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री. विजयकुमार गणपती खोत यांची बिनविरोध निवड झाली.
श्री गुरुदेव पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी टाकळीवाडी चे सुपुत्र विजयकुमार गणपती खोत यांची बिनविरोध निवड
|