बातम्या
गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
By nisha patil - 4/24/2025 6:11:38 PM
Share This News:
गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते ‘जलरथा’चे उद्घाटन
शासकीय योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी बीजेएसचा पुढाकार
राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ योजनेचा प्रचार करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने जलरथ तयार केला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जलरथाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. हा जलरथ प्रत्येक तालुक्यात दोन दिवस फिरून 24 दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.
या प्रसंगी जलसंधारण विभागाचे अधिकारी, बीजेएसचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 10 स्वयंसेवी संस्था या अभियानात सहभागी आहेत. शासन तलावातील गाळ मोफत काढून त्याचे पुनरुज्जीवन करणार असून गाळ अल्पभूधारक, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेतात टाकण्यासाठी अनुदान देणार आहे.
योजनेचा प्रचार करण्यासाठी बीजेएस व शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. सहभागी होण्यासाठी सरपंचांनी ‘बीजेएस डिमांड अॅप’वर अर्ज करावा. अधिक माहिती www.shiwaar.com या पोर्टलवर उपलब्ध आहे.
गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
|