राजकीय

शिरढोण ग्रा.पं.मधील भ्रष्टाचार लपविण्यासाठी सदस्याचा खटाटोप ग्रामस्थांचा आरोप.

Villagers allege member


By nisha patil - 11/12/2025 1:43:24 PM
Share This News:



शिरढोण:-  शिरढोण(ता.शिरोळ) येथील सरपंच सागर भंडारे यांचा राजीनामा प्रकरण न्याय प्रविष्ट असताना ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांनी त्याविषयी निवेदन काढून प्रसिद्धीस देऊन ग्रामपंचायती मध्ये झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिले आहे.
     निवेदनात असे म्हटले आहे की ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीचे १० सदस्य करत आहेत. सरपंच  राजीनामा पदाचा वाद  जिल्हाधिकारी कोल्हापूर  यांच्या कोर्टात न्यायप्रविष्ठ असताना त्या विषयावर बोलणे चुकीचे आहे.त्यावर सर्वस्वी निर्णय घेण्याचा आधिकार  जिल्हाधिकारी यांचा असताना त्याविषयी निवेदन काढून प्रसिद्धीस देणे अयोग्य आहे.


     केवळ ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार लपविण्यासाठी सरपंचाचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी जनता १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत जाब विचारला जाईल.जनता सुज्ञ असून या मागचे षडयंत्र ओळखता न येण्यासारखे काही नाही. या निवेदनावर माजी उपसरपंच अविनाश पाटील, माजी उपसरपंच विजय सूर्यवंशी, प्रवीण दानोळे,अरुण ऐनापुरे, नागेश कोळी यांच्या सह्या आहेत


शिरढोण ग्रा.पं.मधील भ्रष्टाचार लपविण्यासाठी सदस्याचा खटाटोप ग्रामस्थांचा आरोप.
Total Views: 324