बातम्या

*हलकर्णी, तालुका गडहिंग्लज येथील बसस्थानकाजवळील जुना वृक्ष तोडण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Villagers strongly oppose the felling of an old tree


By nisha patil - 3/11/2026 11:35:58 PM
Share This News:



*हलकर्णी, तालुका गडहिंग्लज येथील बसस्थानकाजवळील जुना वृक्ष तोडण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
 

*आजरा(हसन तकीलदार):-हलकर्णी ता. गडहिंग्लज येथील बस स्थानकाजवळील नवीन रस्त्याच्या कामासाठी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या वृक्षाची तोड होण्याची शक्यता आहे त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमधून नाराजीव्यक्त होत आहे व याला ग्रामस्थांचा विरोध दिसून येत असून वृक्षतोड थांबवण्याची मागणी जोर धरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
         

हलकर्णी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी, बसस्थानकाजवळ अनेक वर्षांपासून दिमाखात उभा असलेला भव्य वृक्ष नवीन रस्त्याच्या कामासाठी तोडण्यात येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 

गावाच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेला हा वृक्ष केवळ सावली देणारा नसून हलकर्णी गावाच्या इतिहासाचा आणि ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. बसस्थानकावर येणारे प्रवासी, नागरिक, दुकानदार आणि वाटसरू यांच्यासाठी हा वृक्ष अनेक वर्षांपासून सावलीचा आधार ठरला आहे.
या वृक्षाशी अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडलेल्या आहेत.बालपणाच्या आठवणी यात सामावलेल्या आहेत.मात्र, नवीन रस्त्याच्या कामामुळे या वृक्षावर कुऱ्हाड चालणार असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे.

गावाच्या विकासकामांना ग्रामस्थांचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली गावाचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण नष्ट करू नये, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
 

संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.गावाचा विकास जरूर करा, पण गावाची ओळख पुसू नका!
 हलकर्णीचा ऐतिहासिक वारसा जपा, हा जुना वृक्ष वाचवा!अशी भावना ग्रामस्थांकडून होत आहे.


*हलकर्णी, तालुका गडहिंग्लज येथील बसस्थानकाजवळील जुना वृक्ष तोडण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
Total Views: 85