बातम्या
विनाडोनेशन, पारदर्शी प्रवेश प्रक्रिया राबवा; एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये : आ. राजेश क्षीरसागर
By nisha patil - 1/6/2026 2:30:22 PM
Share This News:
"विनाडोनेशन, पारदर्शी प्रवेश प्रक्रिया राबवा; एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये : आ. राजेश क्षीरसागर"
शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचा आढावा; अतिरिक्त फी, डोनेशन व पालकांच्या लुटीवर कठोर कारवाईच्या सूचना
कोल्हापूर, दि. १ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरू असलेली शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि विनाडोनेशन राबविण्यात यावी. जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये. अतिरिक्त फी, डोनेशन, बिल्डिंग फंड किंवा शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची होणारी आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार Rajesh Kshirsagar यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे शाळा व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिक्षण उपसंचालक Prabhavati Kolekar यांनी शालेय व इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा आढावा सादर केला.
आ. क्षीरसागर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील मनमानी कारभाराविरोधात शिवसेना व युवासेना गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. काही खासगी शाळांकडून अद्यापही मनमानी फी आकारणी सुरू असून, अशा संस्थांवर तातडीने कारवाई करावी. तसेच आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर कोणताही दुजाभाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवण्याचे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरवर्षीप्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत शिक्षण संस्था चालक व प्रशासन यांची संयुक्त बैठक आठवडाभरात आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
चौकट :
प्रवेश प्रक्रियेत अडचण आल्यास शिवसेना-युवासेनेशी संपर्क साधा
शालेय अतिरिक्त फी, डोनेशन, बिल्डिंग फंड तसेच महाविद्यालयीन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास त्यांनी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. राजेश क्षीरसागर यांनी केले. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांची गैरसोय टाळावी यासाठी शिवसेना-युवासेना पूर्णपणे पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विनाडोनेशन, पारदर्शी प्रवेश प्रक्रिया राबवा; एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये : आ. राजेश क्षीरसागर
|