बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या प्रा. विराज जाधव यांना पीएच. डी. प्रदान

Viraj jadhav


By nisha patil - 6/30/2026 3:33:22 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजच्या प्रा. विराज जाधव यांना पीएच. डी. प्रदान

कोल्हापूर दि.30 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील बी.बी.ए. व एम.बी.ए. चे विभागप्रमुख प्रा. विराज विजय जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कॉमर्स अँड मॅनेजमेंट विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी "ए कम्पॅरिटीव्ह स्टडी ऑन जनरेशन एक्स अँड जनरेशन वाय टूवर्ड्स डिजिटल पेमेंट बिहेवियर युझिंग टीपीबी अँड टॅम मॉडेल” या विषयावर विद्यापीठामध्ये प्रबंध सादर केला. प्रा. जाधव यांचे या विषयावर दोन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. प्रा. जाधव यांचे हे संशोधन डिजिटल पेमेंटच्या वर्तणुकीतील पिढ्यांमधील फरक अधोरेखित करते. या निष्कर्षांच्या आधारे वृद्ध आणि तरुण या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र डिजिटल पेमेंट युजर इंटरफेस डिझाईन करून समाजामध्ये कॅशलेस व्यवहारांचा अवलंब वाढवता येईल. धोरणकर्त्यांना सर्वसमावेशक डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी प्रत्येक पिढीची मानसिकता, विश्वास आणि तंत्रज्ञान स्वीकृती लक्षात घेऊन प्रभावी धोरणे आखण्यास हा अभ्यास उपयुक्त ठरेल. डिजिटल पेमेंट कंपन्यांना जनरेशन 'एक्स' पिढीसाठी सोपी आणि सुरक्षित, तर जनरेशन वाय पिढीसाठी नाविन्यपूर्ण आणि गतिमान सेवा विकसित करून वापरकर्त्यांचा अनुभव अधिक प्रभावशाली करता येईल. एकूणच, हा प्रबंध डिजिटल आर्थिक व्यवहार अधिक मजबूत सोपे आणि सुटसुटीत करून कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लागणाऱ्या सामाजिक व धोरणात्मक पाया तयार करण्यास उपयुक्त ठरू शकेल.

प्रा. जाधव यांनी यापूर्वी मॅनेजमेंट विषयामधून नेट व सेट परीक्षाही उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यांना पुणे विद्यापीठातील डॉ. नितीन झावरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. विराज जाधव यांच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, डॉ. श्रुती जोशी आणि विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी अभिनंदन केले.

 

 


विवेकानंद कॉलेजच्या प्रा. विराज जाधव यांना पीएच. डी. प्रदान
Total Views: 10