बातम्या

स्व. रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांची कुटुंबीयांना भेट

Vishwas patil


By nisha patil - 5/11/2025 11:16:51 PM
Share This News:



स्व. रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांची कुटुंबीयांना भेट

 

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आदरांजली अर्पण केली.

या वेळी स्व. आपटे यांची पत्नी श्रीमती पद्मजा आपटे आणि चिरंजीव आदित्य आपटे उपस्थित होते. गोकुळ परिवाराच्या वतीने स्व. आपटे यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

स्व. आपटे यांनी सहकार क्षेत्रात शेतकरीहितासाठी उल्लेखनीय कार्य केले. गोकुळला बळकटी देण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले. संचालक विश्वास पाटील आणि स्व. आपटे यांनी तब्बल ३२ वर्षे गोकुळ संचालक मंडळात एकत्र कार्य केले असून दोघांची सहकार्यपूर्ण भूमिका संघाच्या प्रगतीत मोलाची ठरली.या वेळी भावना व्यक्त करताना संचालक विश्वास पाटील म्हणाले,

“स्व. आपटे साहेबांनी सहकार क्षेत्रात साधेपणा, पारदर्शकता आणि शेतकरीप्रेमाचा आदर्श ठेवला. गोकुळ मजबूत आणि शेतकरीहिताचे राहावे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांचे योगदान आणि आदर्श कार्यगौरव सदैव प्रेरणादायी राहील.”

गोकुळ परिवाराने स्व. आपटे यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या सहकार योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.


स्व. रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांची कुटुंबीयांना भेट
Total Views: 70