बातम्या
बहिरेवाडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दृश्यमान स्वच्छता उपक्रमास सुरुवात
By nisha patil - 2/5/2025 9:53:08 PM
Share This News:
बहिरेवाडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दृश्यमान स्वच्छता उपक्रमास सुरुवात
बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा क्र. २ व "कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू" या दृश्यमान शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी पवार, पंचायत समितीचे अधिकारी व वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रविंद्र जाधव, सरपंच प्रमिला जाधव, उपसरपंच राजाराम जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहिरेवाडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दृश्यमान स्वच्छता उपक्रमास सुरुवात
|