बातम्या
वृद्धाश्रम भेट व अॅम्बुलन्स अनावरण
By nisha patil - 1/8/2025 4:09:22 PM
Share This News:
वृद्धाश्रम भेट व अॅम्बुलन्स अनावरण
महेश जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
आर. के. नगर, कोल्हापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास भाजपचे प्रदेश सचिव मा. महेश बाळासाहेब जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान वृद्धाश्रमात नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या अॅम्बुलन्स वाहनाचे अनावरण त्यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी देवस्थान व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय विजय, सयाजी आळवेकर, शरद पाटोळे, अजय आळवेकर, अवधूत पाटोळे, सतीश आंबर्डेकर तसेच परिसरातील नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून वृद्ध नागरिकांच्या आरोग्यसेवेतील गरजांवर भर देत, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण साकारण्यात आले आहे.
वृद्धाश्रम भेट व अॅम्बुलन्स अनावरण
|