विशेष बातम्या
शिरोली येथील कामगार विमा सोसायटी दवाखान्याला भेट..
By nisha patil - 10/29/2025 2:54:49 PM
Share This News:
शिरोली येथील कामगार विमा सोसायटी दवाखान्याला भेट..
खास. धैर्यशील माने व माजी खा. मंडलिक यांच्या उपस्थितीत दवाखान्यातील कार्यप्रणालीचा आढावा
दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना, शिरोली येथे भेट देऊन दवाखान्यात उपलब्ध असणाऱ्या विविध आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा आणि उपचार पद्धतींची सविस्तर पाहणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णालयाची कार्यप्रणाली, रुग्णसेवेतील अडचणी आणि सुधारणा शक्यता याबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. या भेटीमुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी सकारात्मक पाऊल उचलले गेल्याचे नागरिकांनी नमूद केले.
शिरोली येथील कामगार विमा सोसायटी दवाखान्याला भेट..
|