बातम्या

विटा वकील मारहाण प्रकरण : पोलिसांचे कृत्य गंभीर, सर्किट बेंचची टिप्पणी

Vita lawyer assault case

By nisha patil - 8/20/2025 3:28:14 PM
Share This News:

विटा वकील मारहाण प्रकरण : पोलिसांचे कृत्य गंभीर, सर्किट बेंचची टिप्पणी

विटा येथील ॲड. विशाल कुंभार यांना पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी प्रथमच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी विटा पोलिसांचे कृत्य अत्यंत गंभीर असल्याची टिप्पणी केली.

पोलिसांनी माफी मागण्याची तयारी दर्शविली असली तरी ॲड. अनिकेत निकम यांनी पोलिसांची भूमिका दुटप्पी असल्याचे सांगितले. न्यायालयाने कुंभार यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भात कोणतीही हालचाल न करण्याचे आदेश देत, पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला होणार आहे.

विटा वकील मारहाण प्रकरण : पोलिसांचे कृत्य गंभीर, सर्किट बेंचची टिप्पणी
Total Views: 86