शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयात ‘‘विवेकरेषा’’ व्यंगचित्र प्रदर्शन यशस्वी

Vivek Rekha cartoon exhibition successful


By nisha patil - 12/8/2025 3:20:19 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात ‘‘विवेकरेषा’’ व्यंगचित्र प्रदर्शन यशस्वी
 

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, विवेक वाहिनी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी ‘‘विवेकरेषा’’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रदर्शनात भारतातील निवडक २५ प्रतिभावंत व्यंगचित्रकारांची अंधश्रद्धा विरोधी रेखाचित्रे आणि व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यात आली. 
   

या कार्यक्रमासाठी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन   मानसिंग बोंद्रे(दादा) यांचे मार्गदर्शन लाभले.प्रदर्शनावेळी अनिल चव्हाण यांनी वैज्ञानिक प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या आड दडलेल्या फसव्या प्रकारांचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवून समाजाला कसे फसवले जाते हे प्रत्यक्ष समोर आणले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी मार्गदर्शन करताना डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा-विरोधी मोहिमेचा आढावा घेतला आणि सांगितले, “श्रद्धा डोळस असावी; प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा.”
 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विवेक वाहिनी समन्वयक डॉ. शिवाजी रायजादे यांनी केले, तर आभार प्रदर्शनाचे प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. विजय देठे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. सी. के. पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, परीक्षा प्रमुख डॉ. के. एम. देसाई, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी तसेच ग्रंथपाल डॉ. पी. बी. पाटील उपस्थित होते.
 

या महत्त्वपूर्ण उपक्रमात प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला; प्रदर्शनाने अंधश्रद्धेबद्दल जनजागृती वाढवण्यास आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य तपासण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


शहाजी महाविद्यालयात ‘‘विवेकरेषा’’ व्यंगचित्र प्रदर्शन यशस्वी
Total Views: 49