बातम्या
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘विवेक वाहिनी’ चे उदघाटन संपन्न
By nisha patil - 8/21/2025 6:02:00 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘विवेक वाहिनी’ चे उदघाटन संपन्न
कोल्हापूर दि. 21: “विवेक वाहिनी म्हणजे विद्यार्थ्यांची आवड जोपासणारे आणि त्यांच्या भवितव्याला योग्य दिशा देणारे व्यासपीठ. हा शहाणपण शिकवणाऱ्या गप्पांचा फड आहे. समाजामध्ये भ्रष्टाचार, जातीभेद, लिंगभेद , व्यसनाधीनता, अंधश्रद्धा अशा अनेक समस्या आहेत. विध्यार्थ्यानी त्यांच्या आवडी विकसित करून या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करायला हवे”. असे प्रतिपादन विवेक वाहिनीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी केले. ते विवेकानंद कॉलेज मधील आय क्यू ए सी विभागाद्वारे आयोजित ‘विवेक वाहिनी’ उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणित विभागप्रमुख डॉ. संजय थोरात हे होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. थोरात यांनी समताधिष्टीत आणि विज्ञानधिष्टीत समाज निर्माण करणे हा शिक्षणाचा उद्देश्य आहे आणि त्या दृष्टीने विवेक वाहिनीचे काम महत्वाचे आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय विवेक वाहिनी समन्वयक डॉ. सरिता शिंदे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार सदस्या डॉ. कविता तिवडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘विवेक वाहिनी’ चे उदघाटन संपन्न
|