बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
By Administrator - 11/4/2026 6:46:18 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
कोल्हापुर दि.11 : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये स्त्री शिक्षणाचे जनक व थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.बी.पाटील व लाल बहादूर शास्त्री कॉलेज, साताराचे प्राचार्य डॉ. शेखर मोहिते यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी विवेकानंद कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या महात्मा जोतिबा फुले जयंती समारंभात बोलताना प्रा. समीक्षा फराकटे म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षण व बहुजन शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचा पाया घालून मोठी क्रांती घडविली. फातिमा शेख, ताराबाई शिंदे या त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या विचारांनी प्रेरित झाल्या. शिक्षणाचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी करा. सदसदविवेवबुध्दी जागृत असणं म्हणजे खर शिक्षण होय. हे समजून घ्या. समतेची ज्योती अखंड तेवत ठेवा. हीच महात्मा जोतिबा फुले यांना खरी आदरांजली असेल.
कार्यक्रमाचे आभार डॉ.कविता तिवडे यांनी मानले. यावेळी आयक्यूएसी प्रमुख डॉ श्रुती जोशी, डॉ.एकनाथ आळवेकर, प्रा.विश्वंभर कुलकर्णी, रजिस्ट्रार .एस.के.धनवडे, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
|