बातम्या
शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
By nisha patil - 9/22/2026 1:50:14 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
कोल्हापूर दि.22: शिवाजी विद्यापीठातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि विदयार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी संलग्न महाविद्यालयांसाठी वार्षिक नियतकालिक स्पर्धा आयोजित केली जाते. या नियतकालिकातून महाविद्यालयीन विद्यार्थी विविध साहित्य् प्रकारात लेखन व आपल्या कलेला अभिव्यक्त करत असतात.
या स्पर्धेत गेली अनेक वर्षे विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विवेकानंद कॉलेजच्या विवेक वार्षिक नियतकालिकाने बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला. या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून महाविद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध साहित्य प्रकारात 13 पारितोषिके पटकावली.
या नियतकालिकाचे संपादक म्हणून प्रा. डॉ.एकनाथ आळवेकर यांनी काम पाहिले आहे. विभागीय संपादक म्हणून डॉ.कविता तिवडे, डॉ.आरिफ महात, डॉ.टी.सी.गौपाले, डॉ.प्रदीप पाटील, प्रा.अशोक पाटील, प्रा.विश्वंभर कुलकर्णी, प्रा.एस.एस.जगताप, प्रा.सौ.यु.आर.हिरकुडे, प्रा.नदाफ एस.एच. , प्रा.सतिश उपळावीकर, प्रा.संतोष कुंडले, डॉ. सुप्रिया पाटील, प्रा.राहुल इंगवले यांनी काम पाहिले. ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापकांचे व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सी.ई.ओ.श्री.कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी संपादक मंडळ व सहभागी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
|