बातम्या

झोनल  बॅडमिंटन (महिला)  स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

Vivekanand College First in Zonal Badminton


By nisha patil - 1/10/2026 2:53:46 PM
Share This News:



झोनल  बॅडमिंटन (महिला)  स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

कोल्हापूर. दि.01 : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत  घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय बॅडमिंटन (मुले/मुली) स्पर्धांचे आयोजन गोपाल कृष्ण गोखले कॉलेजने अंबिका डिफेन्स्‍ ॲकेडमी बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी केले होते. यामध्ये विवेकानंद कॉलेजच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक संपादन केला.  या संघामध्ये खालील खेळाडूंचा समावेश होता. श्रेया जाधव, भक्ती गुंजाटे, समृध्दी चौगुले, प्रिती गलानी  व महेक गलानी यांचा सहभाग होता. या खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठाच्या इंटर झोनल स्पर्धेसाठी झाली आहे. 

तसेच याच ठिकाणी झालेल्या मुलांच्या झोनल बॅडमिंटन स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या संघाचा दुसरा क्रमांक आला आहे.  या संघामध्ये  प्रणव साळुंखे, शशांक अग्रवाल, जयंत कुलकर्णी, पार्थ पाटील, मंत्र लोहार यांचा समावेश होता.  या संघाचीही निवड  शिवाजी विद्यापीठाच्या इंटर झोनल स्पर्धेसाठी झाली आहे. 

  सदर खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे,  डॉ.सी.बी.पाटील,  डॉ. एकनाथ आळवेकर, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री सुरेश चरापले तसेच खेळाडूंच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.


झोनल  बॅडमिंटन (महिला)  स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
Total Views: 14