विशेष बातम्या

“विवेकानंद कॉलेज हे शिक्षणाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्राचे संस्कार केंद्र ” आनंद काळे, मराठी सिने अभिनेता

Vivekanand College is a cultural center


By nisha patil - 11/12/2025 5:33:17 PM
Share This News:



“विवेकानंद कॉलेज हे शिक्षणाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्राचे संस्कार केंद्र ”  आनंद काळे, मराठी सिने अभिनेता

 कोल्हापूर, दि.11 :  विद्यार्थ्यांनी शारीरिक,मानसिक,बौद्धिक, भावनिकदृष्ट्या श्रीमंत व्हावे हा मोलाचा संदेश दिला. विवेकानंद कॉलेज हे शिक्षणाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्राचे संस्कार  केंद्र आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, वादन, अभिनय या सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित केल्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होतो.  असे प्रतिपादन प्रसिध्द सिनेअभिनेते मा.आनंद काळे यांनी केले.  ते विवेकानंद कॉलेजमध्ये  ज्युनिअर सायन्स्‍ एज्युकेशन फेअरच्या उद्घघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी थोरात हे होते.   आनंद काळे यांनी  स्वतः दिग्दर्शक, अभिनेता म्हणून मराठी,हिंदी  चित्रपट,मराठी सिरीयल्स मध्ये बहुविध भूमिका केल्या आहेत. तसेच ते एक यशस्वी  उद्योगपती आहेत.  

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात म्हणाले, महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न्‍ असे करावे. या एज्युकेशन फेअरमध्ये 11वी व 12 वी सायन्स या वर्गातील विविध कलाप्रकार  तसेच पोस्टर प्रदर्शन, टाकाऊ पासून टिकावू व फुडस्टॉल इत्यादी मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.  

            कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करुन व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक व स्वागत ज्युनि. सायन्स विभाग प्रमुख प्रा नवले एम.आर. यांनी केले.  पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.सौ. गीतांजली साळुंखे यांनी करुन दिला.  आभार प्रा.एस.टी. शिंदे यांनी मानले.  प्रा.सौ ए पी साळोखे व प्रा सौ ए पी म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील प्रा हिटणीकर एन.एन., प्रा जगताप एस एस, प्रा नाकाडी एल एस, प्रा सौ म्हात्रे ए पी, प्रा सौ एस.ए.माने, प्रा. पाटील आर.एन. प्रा.आर.व्ही.घाटगे यांनी सहकार्य केले. तसेच रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे व सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे  सहकार्य लाभले.


“विवेकानंद कॉलेज हे शिक्षणाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्राचे संस्कार केंद्र ” आनंद काळे, मराठी सिने अभिनेता
Total Views: 12