बातम्या

शिवाजी विद्यापीठ  इंटर झोनल हॉकी  स्पर्धेत विवेकानंद  महाविद्यालय  व्दितीय

Vivekanand College secures second place in the Shivaji University


By nisha patil - 10/26/2026 1:56:58 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ  इंटर झोनल हॉकी  स्पर्धेत विवेकानंद  महाविद्यालय  व्दितीय

कोल्हापूर दि. 26 : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल महिलांच्या हॉकी स्पर्धा संजीवन इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटयुट पन्हाळा यांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम येथे 19 व 20 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज व  डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज यांच्यामध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. यामध्ये ट्रायब्रेकरवर विवेकानंद कॉलेजने व्दितीय क्रमांक प्राप्त केला.

या स्पर्धेतून राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी महिला स्पर्धेसाठीच्या शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला.  या मध्ये शिवाजी विद्यापीठ सराव शिबीरासाठी पूर्वा चौगुले, ईशा जाधव, समृध्दी बराले, दिपाली पाटील, पूर्वा पाटील, समृध्दी यादव व दीक्षा शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

सदर खेळाडूंचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे,  डॉ.सी.बी.पाटील,  डॉ. एकनाथ आळवेकर यांनी अभिनंदन केले.

खेळाडूना  जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, नजीर मुल्ला, योगेश देशपांडे, संतोष चौगुले , सागर जाधव , रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री सुरेश चरापले तसेच खेळाडूंच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.


शिवाजी विद्यापीठ  इंटर झोनल हॉकी  स्पर्धेत विवेकानंद  महाविद्यालय  व्दितीय
Total Views: 16