शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये इको क्लब मार्फत विद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप
By nisha patil - 8/7/2026 9:53:45 AM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये इको क्लब मार्फतविद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप
कोल्हापूर दि.8 : विवेकानंद कॉलेजमध्ये आज मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 इकोक्लब मार्फत विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. केंद्रशासनाकडील दिलेल्या सूचनेनुसार मिशन लाईफ 3.0 अंतर्गत एक पेड माँ के नाम तसेच वृक्ष लागवड उपक्रम राबविणेसाठी विद्यार्थ्यांना 100 रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आपटा, कारंज, चिंच, भोकर, बेल, आवळा, सागवान, सीताफळ झाडांच्या रोपांचा समावेश होता. वनविभाग करवीर यांच्यामार्फत रोपांचा मोफत पुरवठा केला गेला.
रोपांचे वाटप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सी बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ज्युनिअर कॉलेज इको क्लब मार्फत प्रमुख श्री एच. जी. पाटील, डॉ ए जे पाटील यांनी केले. यावेळी सायन्स विभाग प्रमुख श्री एम आर नवले, सौ गीतांजली साळुंखे, श्री एस टी शिंदे, श्री आर व्ही घाटगे व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------
विवेकानंद कॉलेजमध्ये इको क्लब मार्फत विद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप
|