बातम्या

विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. मिलिंद हुजरे यांची निवड

Vivekanand college 14


By nisha patil - 8/7/2026 9:57:24 AM
Share This News:



विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. मिलिंद हुजरे यांची निवड

कोल्हापूर दि. 8: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रभारी सचिव प्राचार्य डॉ. मिलिंद शिवाजीराव हुजरे यांची कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या प्राचार्य पदी अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यापूर्वी त्यांनी संस्थेचे अर्थसचिव म्हणून काम पाहिले असून संस्थेच्या शैक्षणिक, भौतिक सुविधा तसेच गुणवत्ता विकासासाठी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे. सन 1988 पासून प्राणीशास्त्र विषयाचे नामवंत प्राध्यापक म्हणून राजे रामराव कॉलेज, जत येथे त्यांच्या सेवेची सुरुवात झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राणीशास्त्र विषयातील 35 शोध निबंध प्रसिध्द केले आहेत. तसेच 04 आंतरराष्ट्री संशोधन प्रकल्प्‍ यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 06 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

यापूर्वी त्यांनी प्राचार्य म्हणून पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, दत्ताजीराव कदम ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी, या शाखेवर काम केले असून इचलकरंजी शाखेला नॅकचे ए मानांकन प्राप्त्‍ करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी तसेच साहित्यिक क्षेत्रात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

कोल्हापूर येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नामवंत विवेकानंद महाविद्यालयात प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले. तसेच विवेकानंद महाविद्यालयाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, गुरुदेव कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, विवेकानंद कॉलेज हे महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने महाराष्ट्राच्या आधुनिक, शैक्षणिक, गुणवत्ता आणि संशोधन या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. या महाविद्यालयात पुढील काळात सर्वोच्च गुणवत्ता आणि कौशल्यपूर्ण आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना देणेसाठी विविध उपक्रम राबवून हे महाविद्यालय काळाच्या पुढे कायम ठेवण्याचा मानस आहे.

 

 


विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. मिलिंद हुजरे यांची निवड
Total Views: 14