शैक्षणिक

शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड  

Vivekanand college 3


By nisha patil - 4/12/2025 8:21:10 PM
Share This News:



शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड  

कोल्हापूर दि.: 04 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तथा जिल्हा क्रीडा परिषद, इंदापूर पुणे मार्फत दि. २७ ते २८ नोव्हेंबर, 2025 रोजी शहा सांस्कृतिक भवन, तालुका इंदापूर, जि. पुणे येथे १७ वर्षाखालील मुली या राज्यस्तर शालेय कुराश स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या मुलींच्या मधून इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी कुमारी अनुष्का अजित पाटील हिने सुवर्ण पदक मिळविले व तिची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिच्या या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

संघातील खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. एस. के धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.


शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या अनुष्का पाटीलची महाराष्ट्र संघात निवड  
Total Views: 12