बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 6/26/2026 1:49:16 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी**
*विवेकानंद कॉलेजमध्ये शाहू महाराज जयंती साजरी**
*समतेचे प्रणेते शाहू महाराजांना अभिवादन**
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश जयंतीनिमित्त अधोरेखित**
*कोल्हापूर | प्रतिनिधी**विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचे विविध प्रयोग राबवले तसेच विविध जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सोय केल्याचे सांगितले. राधानगरी धरण आणि शाहू मिलसारख्या प्रकल्पांद्वारे त्यांनी शेती व उद्योग क्षेत्राला दिशा दिली. समता, न्याय आणि लोककल्याणाच्या राज्याची स्थापना करणे हे शाहू महाराजांचे महान कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. सुप्रिया पाटील यांनी शाहू महाराजांचे विचार केवळ जतन न करता त्यांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रातील घटकांनी शाहूंच्या दृष्टीकोनातून शिक्षणात सुधारणा घडवून आणून राष्ट्रनिर्मितीसाठी तरुण पिढी घडवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समीक्षा फराकटे यांनी केले, तर आभार ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी मानले. यावेळी विविध प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
|