बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
By nisha patil - 6/6/2026 6:28:14 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
कोल्हापूर दि. 6 : विवेकानंद कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्य् संस्थापक व संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस.के.धनवडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभाग प्रमुख डॉ.एस.आर.कटृटीमनी यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील गौरवशाली दिवस असून अखंड भारताच्या राष्ट्र निर्मितीचा पाया छत्रपती शिवरायांनी आजच्या दिवशी घातला. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ठ् प्रशासक व भारतीय आरमाराचे निर्माते होते.
तसेच या प्रसंगाचे औचित्य् साधून बोलताना प्रा.समृध्दी माने म्हणाल्या, जातीधर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणूसकीने जगायला शिकवणारे राज्य् म्हणजे शिवरायांचे स्वराज्य्. शिवाजी महाराज हे मानवी मूल्ये जोपासणारे प्रगल्भ् विचारांचे तत्ववेता राजे होते. लोककल्याणकारी शासनव्यवस्था हे त्यांचे अंतिम ध्येय होते. त्यांच्या निस्पृह, निष्कलंक चारितत्र्याने बांधलेली नैतिकता स्वराज बांधणीचा मजबूत पाया घालून गेले. ज्यावर आज आपण संपन्न् आणि समृध्द् शाश्वत जीवन जगत आहोत असे मत त्यांनी मांडले.
प्रा. डॉ. कविता तिवडे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे अधीक्षक संजय दळवी, प्रा.सनी काळे, अमित साळुंखे, मदन निगडे, जितेंद्र शिंदे, वसंत पाटील, सर्जेराव खोत, अनिल खोत, प्रशांत पाटील, .पी.बी.हरेर, विनायक जाधव यांच्यासह महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
|