विशेष बातम्या
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची शिवशस्त्र शौर्य गाथा (वाघनखे) संग्रहालय भेट
By nisha patil - 12/12/2025 3:10:33 PM
Share This News:
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची शिवशस्त्र शौर्य गाथा (वाघनखे) संग्रहालय भेट
कोल्हापूर दि. 12 : विवेकानंद ज्युनिअर महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या अंतर्गत 40 विद्यार्थ्यांची कसबा बावडा येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ येथे क्षेत्रभेट आयोजित केली होती. लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वाघनख्यांची माहिती व इतर मराठा कालखंडातील शस्त्रांत्रांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच या संग्रहालयामध्ये तलवारी, कुऱ्हाडी, खंजीर तसेच पितळी व कातड्यापासून बनवलेल्या शस्त्रांची माहिती घेतली
यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांनी पाहिला.
यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरचा विकास, आधुनिक शेतीसाठी केलेले प्रयत्न् , विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या सोयी याबाबत माहिती मिळाली. श्री महाराणी लक्ष्मीबाई साहेब तलाव राधानगरीची प्रतिकृती पाहिली .
या क्षेत्रभेटीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य् कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या क्षेत्रभेटीमध्ये ज्युनि.आर्टस,कॉमर्स विभागप्रमुख प्रा.सौ शिल्पा भोसले, प्रा.सौ.एस.एन.पाटील, प्रा.विश्वंभर कुलकर्णी, प्रा.एस.पी.वेदांते, प्रा सौ एम पी गवळी सहभागी झाल्या होत्या.
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची शिवशस्त्र शौर्य गाथा (वाघनखे) संग्रहालय भेट
|