शैक्षणिक

विवेकानंद महाविद्यालयात बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स एंटायर विभागातर्फे

Vivekananda College


By nisha patil - 9/10/2025 1:00:41 PM
Share This News:



कोल्हापूर दि.9 : येथील  विवेकानंद कॉलेजच्या बी.एस्सी. कॉम्प्युटर एंटायर  विभागाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सहकार्याने  IoT सेन्सर्स आणि ॲक्टयुएटर्स या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स्‍ विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. एम. मस्के हे या कार्यक्रमाचे संसाधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) होते.  व्याख्यानात त्यांनी विविध प्रकारचे सेन्सर्स आणि ॲक्टयुएटर्स , त्यांची कार्यप्रणाली तसेच होम ऑटोमेशन, कृषी आणि औद्योगिक प्रणाली यासारख्या क्षेत्रातील IoT प्लॉटफॉर्ममध्ये त्यांचे एकत्रिकरण कसे केले जाते यावर मार्गदर्शन केले.

          या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्याना IoT प्रणालीमध्ये  सेन्सर्स आणि ॲक्टयुएटर्सची मुलभूत संकल्पना आणि भूमिका समजावून देणे हा होता. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण 102 जणांनी सहभाग घेतला होता.

          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  प्रा. पल्लवी देसाई , बी.एस्सी. कॉम्प्युटर एंटायर  विभागप्रमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.  पाहुण्यांची ओळख प्रा डॉ पूनम जाधव यांनी करुन दिली.  श्री आर ए देशमुख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी लोंढे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.


विवेकानंद महाविद्यालयात बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स एंटायर विभागातर्फे
Total Views: 28