शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजची 12 वी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य्ा व विज्ञान शाखेत
By nisha patil - 2/5/2026 5:10:43 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजची 12 वी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य्ा व विज्ञान शाखेत - अव्वलस्थानी राहण्याची यशस्वी परंपरा कायम
सन 1987 पासून बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य् आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याचा सन्मान 2026 च्या बारावी बोर्ड परीक्षेतही कायम ठेवला आहे. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल 99.27 टक्के लागला. यामध्ये विज्ञान शाखेत प्रथमेश परमेश्वर काकडे 94.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन करुन अव्वलस्थानी राहिला. श्रध्दा गणपत सुतार 92.17 टक्के गुण संपादन करीत दुसरी आली. संचिता नरेंद्र कुलकर्णी 92.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य् (इंग्रजी माध्यम) शाखेचा 92.74 टक्के निकाल लागला. यामध्ये कु. आर्या वरद दीक्षित व अनिष आनंदा संकपाळ यांनी 95.67 टक्के गुण संपादन करुन प्रथम आले. कु. मनुश्री प्रसन्न शहा हिने 95.33 टक्के गुण संपादन करुन दुसरी आली तर कु.स्वालीया चौधरी यांनी 93.33 टक्के गुण मिळवून तृतीय आली.
वाणिज्य् (मराठी माध्यम) मध्ये कु. देसाई सना अल्लाउद्दीन 88.67 % गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु.तोरस्कर साक्षी बाबासो व कु. अनपट रणवीर राजाराम यांनी 86.00 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर कु.माने स्नेहल गौतम हिने 84.67 % गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.
कला शाखेचा 87.67 टक्के निकाल लागला. त्यामध्ये कु.आभा भूषण कपाले 87.67 % गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला, यशोधन नंदकिशोर अनुसे 87.33 टक्के गुण मिळवित दुसरा आला. कु.संस्कृती राजेंद्र रानगे 84.83 टक्के गुण संपादन करुन विवेकानंद कॉलेजमध्ये तिसरी येण्याचा बहुमान संपादन केला. 100 पैकी 100 गुण संपादन करणारे अकौटन्सी विषयामध्ये तीन विद्यार्थी , कॉमर्स मॅथ्स् मध्ये 02 विद्यार्थी, सायन्स मॅथ्स् मध्ये 02 विद्यार्थी तर जिऑलॉजी विषयात 09 विद्यार्थी आहेत.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची विद्यासमिती आणि विवेकानंद कॉलेजने राबविलेल्या विशेष स्कॉलर बॅचच्या प्रयत्नामुळे यावर्षीही विवेकानंद कॉलेजने सर्वात अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली असून विज्ञान, वाणिज्य् आणि कला शाखेतील आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विज्ञान स्कॉलर बॅच प्रमुख प्रा एस.एन.साळुंखे, प्रा.एस.एल.पाटील, वाणिज्य् स्कॉलर बॅच प्रमुख प्रा सौ वर्षा महाडीक, प्रा सौ.भाग्यश्री पाटील, कला विभाग स्कॉलर बॅच प्रमुख प्रा विश्वंभर कुलकर्णी , प्रा. सुभाष रानमाळे यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कला वाणिज्य् विभागप्रमुख प्रा सौ शिल्पा भोसले, विज्ञान विभागप्रमुख प्रा एम आर नवले यांनी व गुरुदेव प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विवेकानंद कॉलेजची 12 वी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य्ा व विज्ञान शाखेत - अव्वलस्थानी राहण्याची यशस्वी परंपरा कायम
|