बातम्या

विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला दुहेरी विजेतेपदाचा मुकुट   

Vivekananda College Crowned


By nisha patil - 10/13/2026 2:52:05 PM
Share This News:



विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला दुहेरी विजेतेपदाचा मुकुट   

डेरवण २६: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. जी. एस.  क्रीडा संकुल डेरवण येथे आज पार पडलेल्या १९ वर्षाखालील विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने सातारा जिल्ह्याचा ३ विरुद्ध 1 असा सलग दुसऱ्या वर्षी पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. सदर संघाची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 v  विजेता मुलांचा संघ:

1.        ईशान माने            2.      जयराज काजरेकर

3.      वरद सांगावकर          4.      आयुष पाटील

5.      ईशान देवणे

v  विजेता मुलींचा संघ:

1.        निहाली निवास पाटील    2.      अनण्या महेश जोशी

3.      समृद्धी संदिप हजारे     4.      समृद्धी बाळासाहेब कोळी

5.      अवंती श्रीराम साळुंखे

 सदर संघातील खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे सर,  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील सर तसेच ज्युनियर विभागाचे प्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. एम आर नवले वरिष्ठ जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव यांचे प्रोत्साहन लाभले.

तसेच कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर व श्री सुरेश चरपाले यांचे मार्गदर्शन लाभले.


विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला दुहेरी विजेतेपदाचा मुकुट   
Total Views: 10