बातम्या
इंटर झोनल टेबल टेनिस (पुरुष) स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
By nisha patil - 9/17/2026 9:44:07 PM
Share This News:
इंटर झोनल टेबल टेनिस (पुरुष) स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
कोल्हापूर. दि.17 : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा येथे घेण्यात आलेल्या इंटर झोरल टेबल टेनिस पुरुष स्पर्धा मध्ये विवेकानंद महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यात या संघाने के.आय.टी. कॉलेजचा 5-4 ने पराभव करुन विजेतेपद मिळविले. या स्पर्धेतूनच शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला आहे.
मागील सलग तीन वर्षे इंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम येऊन विवेकानंद कॉलेजने हॅटट्रीक साधली आहे. या यशाबद्दल टेबल टेनिस पुरुष संघाचे कौतुक व अभिनंदन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांनी केले. या संघात ऋषिकेश नलवडे, आदर्श पाटील, पिनाक पाटकर, केतन सुतार , वरद दिवसे यांचा समावेश होता.
सदर खेळाडूंना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री सुरेश चरापले तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन तिला लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इंटर झोनल टेबल टेनिस (पुरुष) स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
|