बातम्या
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेच्या विभागीय स्तरावर विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने बाजी मारली
By nisha patil - 1/31/2026 4:33:44 PM
Share This News:
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेच्या विभागीय स्तरावर विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने बाजी मारली
कोल्हापूर, दि. 31 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित विवेकानंद कॉलेज (स्वायत्त), कोल्हापूर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि गुरुदेव कार्यकर्त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धाच्या विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाला अव्वल स्थान पटकावले.
दि. ३० जानेवारी 2026 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे ही विभागीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या प्रतिस्पर्धींनी विविध कलागुणांत यश मिळवले.
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गटातील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी मधे अनुराधा भास्कर कांबळे - प्रथम क्रमांक (वक्तृत्व स्पर्धा), शुभम संजय दरगडे - प्रथम क्रमांक (चित्रकला स्पर्धा), सुप्रिया कृष्णात कुंभार - द्वितीय क्रमांक (कराओके स्पर्धा) यात यश संपादन केले तर गुरुदेव कार्यकर्ता गटातील श्री. सागर कांबळे - द्वितीय क्रमांक (कराओके स्पर्धा), प्रा. सतीश उपळावीकर - तृतीय क्रमांक (चित्रकला स्पर्धा), प्रियांका कांबळे - तृतीय क्रमांक (वक्तृत्व स्पर्धा) यामध्ये यश संपादन केले. ज्युनियर कॉलेज (कनिष्ठ महाविद्यालय) गटात वक्तृत्व स्पर्धा : प्रथम - इंदुरकर श्रेया अमर; द्वितीय - मोरे वेदिका दिलीप, सुगम गायन स्पर्धा : प्रथम - साई नारायण गुंडकल्ले, टॅलेंट सर्च स्पर्धा : प्रथम - श्रावणी उत्तम सांगळे, चित्रकला : द्वितीय - सायमा आसिफ गोलंदाज यांनी यश संपादन केले. या स्पर्धेच्या शाखास्तरीय फेरीत निवड झालेल्या विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी दाखवली.
विवेकानंद सप्ताह स्पर्धा विवेकानंद कॉलेज शाखा समन्वयक प्रा. अविनाश गायकवाड, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. कैलास पाटील, डॉ. अस्मिता तपासे, डॉ. समीक्षा फराकटे,डॉ . संजय अंकुशराव, डॉ. सुमय्या इनामदार, डॉ. प्रदीप पाटील, प्रा.सतीश उपळावीकर यांच्यासह अनेक शिक्षक-कर्मचाऱ्यांनी शाखास्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी सर्व यशस्वी स्पर्धक, समन्वयक व सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले असून, ही कामगिरी संस्थेच्या शिक्षण व संस्कारक्षम विकासाच्या ध्येयाशी सुसंगत असल्याचे सांगितले. या शाखास्तरीय स्पर्धेसाठी आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती जोशी, रजिस्टार श्री. सचिन धनवडे, श्री. सदानंद दुर्गुळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. ही स्पर्धा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या वतीने राज्यस्तरीय स्तरावर आयोजित केली जाते. विभागीय स्तरावरील ही यशस्वी कामगिरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विवेकानंद कॉलेजच्या प्रतिनिधींना मजबूत आधार देणारी ठरेल.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेच्या विभागीय स्तरावर विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने बाजी मारली
|