बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Vivekananda College ambedkar jayanti


By nisha patil - 4/14/2026 3:37:44 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कोल्हापूर दि. 14 : येथील विवेकानंद महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्‍न्‍ा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 यावेळी बोलताना प्रा.समीक्षा फराकटे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार , समानता आणि सामाजिक न्यायाचे महान प्रवर्तक होते. त्यांनी राज्यघटना निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान दिले. त्यांनी मानवतेचा विचार मांडला. महिलांच्या हक्क आणि सन्मानासाठी त्यांनी कायद्याव्दारे भरीव कार्य केले. आजच्या काळाच्या संदर्भात त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. प्रास्ताविक व स्वागत भूगोल विभागप्रमुख डॉ.जी.एस.उबाळे यांनी केले. तर आभार प्रा.एच.व्ही.चामे यांनी मानले.

या कार्यक्रमास डॉ.टी.सी.गौपाले, प्रा.पी.आर.बागडे, प्रा सौ एम आर माने, प्रा यु एच तिजईकर, प्रा सौ एस पी पाटील, प्रा.संपदा टिपकुर्ले, प्रा नयना पाटील, प्रा सौ एस पी पाटील, रजिस्ट्रार श्री.एस. के.धनवडे, श्री सदानंद दुर्गुळे,

अमर जाधव, वसंत पाटील,  सर्जेराव खोत,  अजित जाधव, संजय पोवार,  सागर कांबळे,  व्ही एस खंदारे,  आर डी माने,  विनायक जाधव, ज्युनिअर, सिनिअर कॉलेज मधील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Total Views: 16