विशेष बातम्या

विवेकानंद कॉलेज तर्फे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम संपन्न

Vivekananda College completes Panhala


By nisha patil - 11/12/2025 5:31:23 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेज तर्फे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम संपन्न

 कोल्हापूर, दि.11 : मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देणारी मोहीम व इतिहासाची साक्ष घालत पन्हाळा ते पावनखिंड परिसरातील ही आव्हानात्मक आणि प्रेरणादायी पदभ्रमंती विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व NCC छात्रानी यशस्वीरित्या पूर्ण केली. यावेळी शिवकाळातील पराक्रमाची साक्ष देणाऱ्या वीर शिवराय आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची आठवण ताजी केली.

या पदभ्रमंतीची सुरुवात पहाटे पन्हाळा किल्ल्यावरून झाली. जंगलातील वाटा, चढ-उतारांनी भरलेले डोंगररांग, तसेच अवघड मार्ग पार करत विद्यार्थ्यांनी व NCC छात्रानी अत्यंत शिस्तबद्ध प्रवास केला. पावनखिंड येथे पोहोचताच सर्वांनी बाजीप्रभू देशपांडे व बांदल मावळे  यांच्या बलिदानास अभिवादन केले. सर्वांनी त्यांच्या शौर्यगाथेला वंदन करत एक मिनिट मौन पाळले.

या पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन एन.सी.सी. मुली विभागाच्या ANO मेजर सुनिता भोसले व

आय. क्यू. ए.सी.प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांचे मार्फत करण्यात आले होते.  ही पदभ्रमंती मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व  अध्यक्ष श्री. हेमंत साळोखे, सदस्य्‍ शुभम् कोळी, प्रविण  केंबळे, योगेश वेटोळे, पार्थ जाधव, केतन कांबळे, राजवर्धन  आडनाईक, अखिलेश गुरव यांचे सहकार्य लाभले.
    
या पदभ्रमंतीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस. पी थोरात, 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडींग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे, प्रबंधक श्री. एस.के.धनवडे यांचे प्रोत्साहन लाभले. 


विवेकानंद कॉलेज तर्फे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम संपन्न
Total Views: 15