शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजने गुणवत्तेचा झेंडा कायम फडकावला – प्राचार्य अभयकुमार साळुंखे
By nisha patil - 6/5/2025 9:30:26 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजने गुणवत्तेचा झेंडा कायम फडकावला – प्राचार्य अभयकुमार साळुंखे
कोल्हापूर, दि. ०६ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेजने गेली तीन तपे गुणवत्तेचा झेंडा कायम फडकावला आहे. विज्ञान, वाणिज्य व कला शाखांमध्ये बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान वर्षानुवर्षे राखल्याबद्दल कॉलेजने विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत “आपल्या बुद्धिमतेसह सुसंस्कारांमुळे हे विद्यार्थी देशाचे सामर्थ्य ठरतील,” असे मत व्यक्त केले.
प्राचार्य साळुंखे म्हणाले, “सर्वसामान्य, होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य विवेकानंद कॉलेजने प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळे आज हे महाविद्यालय शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही नावारूपाला आले आहे.”
प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी विवेकानंद महाविद्यालयाच्या कार्यक्षमतेवर भाष्य करताना सांगितले की, “महाराष्ट्रातील अधिकारप्राप्त स्वायत्त महाविद्यालयांमध्ये विवेकानंद कॉलेज अग्रगण्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ज्ञान क्षेत्रे येथे कार्यरत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेऊन उज्वल भविष्य घडवावे.”
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार :
विज्ञान शाखेतील डालमेट कित फ्रान्सिस, माधुरी जाधव, साक्षी शर्मा, श्रुती मगदूम,
वाणिज्य शाखेतील रेहान कित्तूर, नंदना कुलकर्णी, स्वरा दामुगडे,
कला शाखेतील करण पाटील, गौरी मते, इंद्रजीत साळोखे यांच्यासह JEE परीक्षेत उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने झाली. सौ. शिल्पा भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. एस.पी. वेदांते यांनी तर आभार प्रा. एस.टी. शिंदे यांनी मानले. या वेळी पालक, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजने गुणवत्तेचा झेंडा कायम फडकावला – प्राचार्य अभयकुमार साळुंखे
|