शैक्षणिक
विवेकानंद कॉलेज तर्फे करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
By nisha patil - 10/15/2025 4:48:48 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज तर्फे करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुढाकार
कोल्हापूर दि.15 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार विवेकानंद कॉलेजने राज्यातील पूरग्रस्त भागातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि.सोलापूर येथील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विवेकानंद कॉलेजच्या प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांनी स्वइच्छेने पैसे देऊन सढळ हाताने मदत केली. एकूण रुपये 1,28,630/- इतकी रक्कम जमा झाली.
यावेळी प्रत्यक्ष करमाळा, सोलापूर येथील विविध भागात जाऊन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त समितीने पाहणी करुन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा, जि.सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सॅक, वहया, फराळाचे पदार्थ इत्यादीचे वाटप केले व विद्यार्थ्यांच्या बँन्क खात्यावर प्रवास खर्च व कपडेखरेदीसाठी रक्कम वर्ग करण्यात आली.
यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यानी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. एस. पी. थोरात, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. ए एस कुंभार, डॉ. आरिफ महात, डॉ. एस एस अंकुशराव, प्रा ए बी वसेकर, रजिस्ट्रार एस के धनवडे यांनी केले.
विवेकानंद कॉलेज तर्फे करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
|