बातम्या

झोनल  क्रिकेट  स्पर्धेत  विवेकानंद  महाविद्यालय  प्रथम

Vivekananda College stands first in the zonal cricket tournament


By nisha patil - 10/24/2026 10:20:11 PM
Share This News:



झोनल  क्रिकेट  स्पर्धेत  विवेकानंद  महाविद्यालय  प्रथम

कोल्हापूर दि. 24 : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर झोनल महिलांच्या क्रिकेट स्पर्धा दत्ताजीराव कदम महाविद्यालय, इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजने महावीर कॉलेजवर  विजय मिळवून झोनल क्रिकेट (महिला) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

या संघाची निवड चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथे दि. 26 व 27 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल महिला क्रिकेट स्पर्धेसाठी झाली आहे.

या स्पर्धेत एकूण सहा महाविद्यालयाच्या संघानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत सहभागी खेळाडू मध्ये  मिसबा सैय्यद (कप्तान),  संजना वाघमोडे, प्रिती शेळके, अनिषा बिकड, प्रियांका नाजरे, स्वामिनी गावडे, दृष्टी पोवार, निसर्गा शिंदे, सिंधी परसपुरे, रिया दुमके, विद्या ढगे, पूर्वा लवांगरे, प्रिया गुरव  यांचा  समावेश होता. 

  सदर खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे,  डॉ.सी.बी.पाटील,  डॉ. एकनाथ आळवेकर, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, श्री सुरेश चरापले तसेच खेळाडूंच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.


झोनल  क्रिकेट  स्पर्धेत  विवेकानंद  महाविद्यालय  प्रथम
Total Views: 13