शैक्षणिक
एन.सी.सी. च्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विवेकानंद कॉलेजच्या छात्रांचे सुयश
By nisha patil - 5/22/2026 3:50:54 PM
Share This News:
एन.सी.सी. च्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विवेकानंद कॉलेजच्या छात्रांचे सुयश
कोल्हापूर दिनांक : 22 राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर CATC- 304 दिनांक 11 मे 2026 ते 20 मे 2026 या कालावधीत एनसीसी भवन कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. हे शिबिर 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शस्त्र हाताळणे, फायरिंग, नकाशा वाचन, प्राथमिक उपचार आणि फिटनेसचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यामध्ये विवेकानंद कॉलेजची एनसीसी ची विद्यार्थिनी सार्जंट पूर्वा धनंजय चौगुले यांनी कॅम्प् सीनियर म्हणून कार्य केले तसेच सार्जंट़ सृष्टी सचिन पाटील यांनी प्रश्नमंजुषा या उपक्रमात प्रथम पारितोषिक पटकावले आणि सीपीएल प्राची मारुती चव्हाण हिने फिल्ड् सिग्नल या उपक्रमात प्रथम पारितोषिक पटकावले आणि CQMS विविका कदम हिचा उत्तम माईक कोऑर्डिनेटर म्हणून गौरव करण्यात आला . तसेच CPL श्रुती भोसले हिने नकाशा वाचन या उपक्रमात प्रथम पारितोषिक पटकावले.
या शिबिरादरम्यान स्वच्छ भारत अभियान आणि महिला सक्षमीकरण या विषयावर जनजागृती उपक्रम राबवले. या शिबिरामुळे कॅडेट्स मध्ये आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्ती शिस्त व राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी, सहायक एनसीसी अधिकारी आणि प्रशिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.
या शिबीरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील, एन.सी.सी. अधिकारी डॉ.नम्रता नरेवाडीकर यांचे सहकार्य लाभले.
एन.सी.सी. च्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विवेकानंद कॉलेजच्या छात्रांचे सुयश
|