विशेष बातम्या
विवेकानंद कॉलेजच्यावतीने आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन
By nisha patil - 12/12/2025 3:09:05 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्यावतीने आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन
कोल्हापूर 12: विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांच्यावतीने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संलग कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामधील महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी थोरात यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाप्रसंगी डॉ. ई.बी.आळवेकर, डॉ.सी.बी.पाटील, कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटना अध्यक्ष विजय साळोखे-सरदार त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे चेअरमन डॉ. विकास जाधव, स्पर्धा निरीक्षक डॉ. संतोष जाधव, निवड समितीचे सदस्य डॉ.रणजीत इंगवले, डॉ. एच.ए नारायणकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण कॉलेज इस्लामपूर, द्वितीय क्रमांक विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, तृतीय क्रमांक स. ब. खाडे कॉलेज कोपार्डे, चतुर्थ क्रमांक डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, स्पर्धेमधून शिवाजी विद्यापीठाचा पुरुष हॉकी संघ निवडण्यात आला आहे. मुख्य पंच म्हणून नजीर मुल्ला सहाय्यक पंच म्हणून सागर जाधव, योगेश देशपांडे, राहुल गावडे, श्वेता पाटील हे होते. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास जाधव यांनी केले, तर आभार प्राध्यापक समीर पठाण यांनी मानले.
स्पर्धेचे यशस्वी संयोजन प्रा .संतोष कुंडले,प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस.के.धनवडे प्रशासकीय सेवक सुरेश चारपले यांनी केले. या स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन व बहुमोल सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजच्यावतीने आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन
|