शैक्षणिक

विभागीय व्हॉलीबॉल महिला स्पर्धेत विवेकानंद काॅलेज तृतीय

Vivekananda College third in the zonal volleyball


By nisha patil - 9/27/2025 4:28:23 PM
Share This News:



विभागीय व्हॉलीबॉल महिला स्पर्धेत विवेकानंद काॅलेज तृतीय

 

कोल्हापूर दि.27  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व जनता शिक्षण मंडळ देवचंद कॉलेज, अर्जुननगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल महिला व्हॉलीबॉल स्पर्धे मध्ये विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर च्या महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला. संघाची वेणूताई चव्हाण कॉलेज,कराड येथे होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड झाली.

यशस्वी खेळाडूला श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे  यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.


विभागीय व्हॉलीबॉल महिला स्पर्धेत विवेकानंद काॅलेज तृतीय
Total Views: 70