बातम्या
विवेकानंद कॉलेजला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद
By nisha patil - 3/9/2025 3:31:47 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद
कोल्हापूर दि.: 03. कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने संजीवन स्कूल हॉल रंकाळा, कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने विेजेते पद मिळविले.
सदर विजेते पद मिळविताना मुलांनी अंतिम सामन्यात न्यू हायस्कूल संघाचा 2-0 ने पराभव व मुलीनी डी. वाय. पाटील कॉलेजचा 2-0 ने पराभव करीत विजेते पद मिळविले.
विजेता मुलांचा संघ:
1. ईशान सुभाष पटेल
2. केतन विनायक सुतार
3. वेदांत राजेंद्र पाटील
4. शिवम राजू गुप्ता
5. सोहम शिवकुमार चव्हाण
v विजेता मुलींचा संघ:
1. निहाली निवास पाटील
2. माही पुष्कराज जनवाडकर
3. संस्कृती शैलेश थोरात
4. समीक्षा युवराज पोवार
5. समृद्धी संदिप हजारे
संघातील खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------------------------------------------------------------------------
विवेकानंद कॉलेजला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद
|