बातम्या
टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय प्रथम
By nisha patil - 9/30/2025 12:29:36 PM
Share This News:
टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय प्रथम
कोल्हापूर दि. 30 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग साळोखेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल महिला व पुरुष टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय,कोल्हापूरचा टेबल टेनिस पुरुष संघ अंतिम सामन्यात के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, वर मात करून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. संघाची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे होणाऱ्या इंटरझोनल टेबल टेनिस स्पर्धेकरिता निवड झाली.
महाविद्यालयाचा संघ
1) अनिष सोनटक्के - बी.कॉम.भाग ३
2) भव्य शाह - बी.कॉम.भाग ३
3) आदर्श पाटील - बी. ए. भाग २
4) ऋषिकेश नलवडे - एम.कॉम. भाग १
5) समर्थ चव्हाण - बी.एस.सी. सी.एस. भाग २
यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले व प्रोत्साहन दिले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व सुरेश चरापले यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय प्रथम
|