बातम्या

बुध्दीबळ स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

Vivekananda College wins first place in chess competition


By nisha patil - 9/10/2025 2:56:07 PM
Share This News:



बुध्दीबळ स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग भडगाव, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल महिला व पुरुष बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचा महिला बुद्धिबळ संघ विजेता ठरत जनरल चॅम्पियनशिप मिळवली. तसेच पुरुष गटात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. बुद्धिबळ महिलांमध्ये सृष्टी कुलकर्णी बी.बी.ए. भाग ३ - तृतीय क्रमांक,  मुक्तांजली सावंत बी.कॉम. भाग ३ - ५ वा क्रमांक तर पुरुषांमध्ये ऋषिकेश कबनुरकर - बी.कॉम. भाग  १ - प्रथम क्रमांक यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन.

यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

  


बुध्दीबळ स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
Total Views: 71